मुंबई : शेतकऱ्यांना (Farmer)संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज गुरुवार (दि.२४) रोजी राज्यभर प्रहार (Prhar)संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत शेतकरी देखील रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. यात नांदेड, नाशिक, अमरावती, वाशीम, शिर्डी, नगर याठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा