परळी वैजनाथ दि.२४(प्रतीनिधी): येथील रेल्वे स्टेशनच्या उत्तर बाजूस असलेल्या पालांमध्ये चंदनाची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर बुधवार (दि.२३)रोजी रात्री कारवाई करत २१७ किलो चंदन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ८,६८,००० इतकी आहे.पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले .
संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन ते इराणी गल्ली या परिसरात तस्करांनी कापडी पालांमध्ये चंदन साठवले होते. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर बुधवार (दि.२३) रोजी रात्री कारवाई करत २१७ किलो चंदन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ८,६८,००० इतकी आहे.पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. हि कारवाई पोलिस अधीक्षक नवनित काँवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे यांनी केली.