Advertisement

 खुब लढी मर्दानी; उपांत्य फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाचा पराभव

प्रजापत्र | Wednesday, 04/08/2021
बातमी शेअर करा

  

 

 

भारतीय महिला हॉकी संघाने आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने गोल करत धडाकेबाज सुरुवात केली होती. पण त्यानंतर अर्जेंटीनाने दोन गोल करत २-१ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि विजय साकारला. पण या पराभवानंतरही भारतीय संघाला कांस्यपदक पटकावण्याची संधी नक्कीच आहे.

 

 

भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत सामन्यात १-० अशी दमदार आघाडी घेतली होती. भारताची कर्णधार राणी रामपालने यावेळी पेनेल्टी कॉर्नर घेतला होता, त्यावर गुरजित कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातही भारताने अशीच सुरुवातीला आघाडी घेतली होती. भारताचा गोल झाल्यावर अर्जेंटीनाने भारतावर जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली होती. पण पहिल्या सत्रात भारताने त्यांची आक्रमणं थोपवून लावली होती आणि पहिल्या सत्रात भारताने १-० अशी आघाडी कायम ठेवली होती.

 

 

 

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटीनाला गोल करण्यात यश मिळाले. सामन्याच्या १७व्या मिनिटाला अर्जेंटीनाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर सामन्याच्या २१व्या मिनिटाला भारतााल गोल करण्याची एक संधी मिळाली होती. पण यावेळी भारताला या संधीचे सोने करता आले नाही. सामन्याचे २७वे मिनिट चांगलेच रंगतदार ठरले. कारण या एकाच मिनिटात पंचांनी तीन पेनेल्टी कॉर्नर दिले होते, यामध्ये भारताला दोन आणि अर्जेंटीनाला एक मिळाला होता. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी चांगली खेळ केला आणि सामन्याच्या मध्यंतरापर्यंत हा सामना १-१ अशा बरोबरीत होता.

 

त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या सत्राची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिसऱ्या सत्रात अर्जेंटीनाने अजून ३६ व्या मिनिटाला एक गोल केला आणि सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सामन्याच्या ४०व्या मिनिटाला भारताच्या नेहाला ग्रीन कार्ड मिळाले आणि ती सामन्यातून दोन मिनिटांसाठी बाहेर गेली.उपांत्य फेरीपूर्वी झालेल्या ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये अर्जेंटीनाने चार सामने जिंकले आहेत तर त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे भारताने या ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत, तर त्यांना पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघ जेव्हा अर्जेंटीनाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्यांना एका सामन्यात विजय मिळता आला होता, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
 

 

 हेही वाचा ..

    फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं! 

http://prajapatra.com/2810
 

Advertisement

Advertisement