अंबाजोगाई दि.२१(प्रतिनिधी): शहरातील राजवीर बिअर शॉपी अज्ञात चोरट्यांनी शनिवार (दि.१९) रोजी रात्री फोडल्याची घटना घडली असून चोरट्यांनी एकूण ६,३००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यंकटेश नागनाथ गंजेवार (वय २६) रा.कृष्णाईनगर अंबाजोगाई यांची शहरातील श्रीकृष्ण नगर मानव लोकच्या जवळ असलेल्या राजवीर बियर शॉपीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवार (दि.१९) रोजी रात्री किंगफिशर कंपनीचे ३० बॉक्स ३६० बॉटल ज्याची अंदाजे किंमत ६,३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून रविवार (दि.२०) रोजी व्यंकटेश गंजेवार यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा