Advertisement

सुरज चव्हाणला मारहाण प्रकरण भोवलं 

प्रजापत्र | Monday, 21/07/2025
बातमी शेअर करा

 मुंबई : अखिल भारतीय छावा संघटनेचे (Chava Sanghatana) पदाधिकारी विजय घाडगे (Vijay Ghadge) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan Resignation) यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरज चव्हाण यांना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

            लातूरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज अजित पवारांनी तातडीने सूरज चव्हाण यांना बोलावले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जाते. दरम्यान, अजित पवारांनी आज दुपारी १२.११ वाजता लातूरमधील घटनेचा कडक शब्दात निषेध केला. त्यानंतर १२.५९ वाजता लगेच दुसरे ट्विट करत सूरज चव्हाण यांना तातडीने पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. 

Advertisement

Advertisement