Advertisement

दोन वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

प्रजापत्र | Saturday, 13/02/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१३ (प्रतिनिधी)-येथील शिक्षक साजेद अली खान यांच्या खून प्रकरणातील कुख्यात आरोपी शेख बबरच्या केज तालुक्यातील बनसारोळा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. दोन वर्षांपासून सदर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. 
                शेख बब्बर शेख युसूफ उर्फ काल्या (रा.बांगरनाला) असे या आरोपीचे नाव असुन त्याच्याविरोधात बीड येथील शिवाजी नगर पोलिसात बालेपीर भागातील शिक्षक सय्यद साजेदअली यांचा खुन प्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलीस तब्बल दोन वर्षांपासून त्याच्या मागावर होते.परंतु अनेकनवेळा त्याने पोलीसांना गुगांरा दिला होता. तो बनसारोळा मध्ये असल्याची माहीती  बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पो.नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बनसारोळा येथे दाखल झाले व या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. तर याच गुन्ह्यातील शेख बब्बर शेख युसूफ रा.खासबाग, बीड यास पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
           दरम्यान २०१३ मध्ये युसुफ वडगाव पोलिसात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला पिण्या उर्फ संतोष बाबू भोसले रा.लोणगांव ता. माजलगांव यास सोनपेठ येथून ताब्यात घेण्यात आले असून युसुफ वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Advertisement

Advertisement