बीड दि.२१ (प्रतिनिधी):- बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक २ आणि प्रभाग क्रमांक १८ मध्ये कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी,मतदारांमध्ये दिसणारा उत्साह हा बीडच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या स्मिता विष्णू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी करा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत, लोकांसाठी प्रामाणिक काम करणारे उमदेवार निवडून दिले आहेत. या उमेदवारांना मतदार निश्चितच स्वीकारणार आहेत. मतदार बांधवांमध्ये दिसणारा उत्साह हा बीडच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे. असे आ.क्षीरसागर यांनी सांगितले. गुरुवार (दि.२) रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक २ मध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवार असलेल्या स्वाती सचिन दुधाळ आणि विष्णू शामराव वाघमारे तसेच प्रभाग क्रमांक १८ मधून उमेदवार असलेले शेख अब्दुल मुखीद अब्दुल रज्जाक (मुखीद लाला) आणि शेख फरहीन अर्शान (शेख रोहिल रफिक) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकांनी प्रचार कार्यक्रमाला सुरूवात झाली. आयोजन केवळ कॉर्नर बैठकांचे असताना या बैठकांनी सभेचे स्वरूप धारण केले होते. दरम्यान यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्मिताताई विष्णू वाघमारे यांची प्रमुख उपस्थित होती.

