Advertisement

खुद्द आमदारांनीच पकडला 50 लाखांचा दारूसाठा, पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह......!

प्रजापत्र | Wednesday, 20/01/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे / केज

चंद्रपूर दि.२० - चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर शहरात येणारा 7 पिकअप वाहन भरुन देशी दारुचा साठा पकडला. पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी जिल्ह्यात बेधडक येणारे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दारुबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज होती. त्यामुळे सदर कारवाईचे कौतुक होत आहे.  ताब्यात घेतलेला एकूण मुद्देमाल 50 लाखांहून अधिक रकमेचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा पासिंगचे हे पिकअप शेकडो पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचल्याने पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पडोली पोलीस ठाण्यात सध्या या वाहनांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

             चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे बोलले जाते. मात्र, याचा नमुना आज बघायला मिळाला. चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणारा 7 पिकअप वाहन भरुन देशी दारुचा साठा पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबविले.

Advertisement

Advertisement