Advertisement

मांजरा धरण शंभर टक्के पूर्ण क्षमतेने येत्या काही तासात भरणार

प्रजापत्र | Friday, 14/10/2022
बातमी शेअर करा

कळंब : लातूर ,बीड ,उस्मानाबाद या जिल्ह्यांना पिण्याचे पाणी व सिंचन यासाठी वरदान ठरलेले धनेगाव तालुका केज येथील मांजरा धरण, धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरत असून शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:00 वाजता धरणात एकूण क्षमतेच्या 90 .41℅ पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक 122 . 91 घनमीटर प्रतिसेकंद आहे, हे बघता धरण लवकरच भरत आहे. यामुळे धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे. यासाठी पाणलोट क्षेत्र गावातील नागरिकांना विसर्ग अलर्ट द्वारे सावधान तेचा इशारा देण्यात आला आहे.

 

केज तालुक्यातील धनेगाव येथे असलेल्या या धरणातून लातूर ,कळंब, अंबाजोगाई ,केज ,धारूर या सह बारा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. लातूर, उस्मानाबाद ,बीड जिल्ह्यातील धरण क्षेत्र व पाणलोट क्षेत्र यासाठी पिण्याचे पाणी व सिंचनासाठी हे धरण वरदान आहे. गत तीन वर्षापासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे.

 

 यावर्षीही धरण क्षेत्रात पावसाने सरासरी पूर्ण केली असली तरी जोराचा पाऊस न झाल्याने धरण अध्यापि भरले नव्हते. गत दोन दिवसापासून परतीच्या पावसाने जोर लावला असून यामुळे धरणात पाणीसाठा झपाट्याने होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत धरणात 642 / 642 . 37 मीटर पाणीसाठा होता. एकूण पाणीसाठा 207 .128 / 224 .93 दशलक्ष घनमीटर तर जिवंत पाणीसाठा 169.998 / 176.963 दशलक्ष घनमीटर टक्केवारी 90.41% एवढी होती. तर धरणामध्ये 122.91 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे.

 

                   मांजरा प्रकल्प धनेगाव पूर र्नियंत्रण शाखा अधिकारी सुरज निकम यांनी विसर्ग अलर्ट जाहीर केला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील गावा करिता तहसीलदार कळंब/ केज/ आंबेजोगाई /लातूर/ रेणापुर/ निलंगा यांना याविषयीची सुचित करण्यात आले आहे . मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तसेच धरणात येणारी जास्तीचे पाण्याची आवक पाहता मांजरा धरणातून द्वार परिचलन आराखड्यानुसार धरण 100% पाणी पातळी झाल्यानंतर द्वार उडून पाणी नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता आहे. कुणी पात्रात प्रवेश करू नये याकरता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा अशा स्वरूपाचा विसर्ग अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement