गुजरातमधील खेडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात झालेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत. उंधेला गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील प्रमुखांनी हा गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. येथून जवळच मंदिर आणि मशीद आहे. कार्यक्रम सुरु होण्याआधी काही लोकांनी येऊन तो बंद करण्यास सांगितलं. यानंतर केलेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत.
दगडफेक झाल्याची माहिती मिळताच डीएसपी राजेश गाधिया आणि क्राइम ब्रांचचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. पोलीस सध्या आरोपींची ओळख पटवत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा