उमरगा प्रतिनिधी - उमरगा तालुक्यातील थोरलेवाडी शिवारातील शेतात गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा तालुक्यातील थोरलेवाडी शिवारातील शेत मालक सायबण्णा भानुदास चिंचोळे (वय ३८ वर्षे) यांनी गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची विश्वसनीय खबर पोलीसांना मिळाली होती.
उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज राठोड, सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस अंमलदार कोळी, घोलसगाव, अवचार यांसह तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. काजळे व शासकीय दोन पंच यांच्या उपस्थितीत सोमवारी (२६ सप्टेंबर) दुपारी सव्वा चारच्या सुमारास शेतात पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी तेथील सोयाबीन पिकात गांजाची लहानमोठी अशी एकुण ९१ झाडे आढळली. ही गांजाची झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली असता त्यांचे वजन ८२० ग्रॅम इतके आढळले. यावरुन उमरगा पोलिस ठाण्यातल पोलिस अंमलदार दिगंबर सूर्यवंशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबण्णा चिंचोळे
यांच्याविरुध्द उमरगा पोलिस ठाण्यात नार्कोटीक्स ड्रग्ज अॅन्ड सायकोट्रॉपीक सबस्टान्स अॅक्ट (एनडीपीसएस अॅक्ट) कलम-20 (अ) नुसार गुन्हा नोंदवला आहे.