उस्मानाबाद, दि. 27 - राहत अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मागील 14 वर्षांपासून सर्वसामान्यांना अडीअडचणीच्या काळात अर्थ पुरवठा करून दिलासा दिला असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सजियोद्दीन शेख यांनी केले.
राहत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी सहकार प्रशिक्षण बोर्डाचे जाधव, ‘उलेमा-ए-हिंद‘चे जिल्हाध्यक्ष मौलाना अहेमद, तहसीलदार मुस्तफा खोंदे, ऑडिटर अरूण कांबळे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अजय वाघाळे उपस्थित होते.
यावेळी वर्ष 2021-2022 चे अहवाल वाचन सोसायटीचे सचिव रियाज शेख यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सजियोद्दीन शेख यांनी अशरफोद्दीन शेख यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोसायटीला नफा ना तोटा या तत्वावर सर्वसामान्यांना आर्थिक बळ देण्याचे कार्य मागील 14 वर्षांपासून सातत्याने करत आहे. सर्वसामान्यांना बिनव्याजी कर्ज सहज उपलब्ध करून सावकारांमार्फत होत असलेल्या आर्थिक पिळवणूकीपासून सर्वसामान्यांना राहत (समाधान) मिळणे हा सोसायटीचा मुख्य उद्देश असल्याचे मत अध्यक्षांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा तसेच आदर्श सभासदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिकंदर पटेल यांनी व्यक्त केले.