खेड-तालुका मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेत्तर संघ यांच्या वतीने 18 सप्टेंबर रोजी खेड पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक गुणवंत लेखनिक गुणवंत सेवक जिल्हास्तरीय या पुरस्कारांचे व राजगुरुनगर रत्न पुरस्काराचे आयोजन रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय खेड या ठिकाणी करण्यात आले होते. यामध्ये बा.मा.पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी, चाकणमधील हर्षद पांडुरंग सावंत यांना जिल्हास्तरीय गुणवंत सेवक हा पुरस्कार मिळाला. याबद्दल ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचलित बिरदवडीच्या अध्यक्षा प्रा.देवयानी पवार व सचिव ईशान यशवंत पवार यांच्या वतीने हर्षद सावंत यांचा आज संस्थेच्या कार्यालयात शाल श्रीफळ व केक कापून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक विजय चव्हाण सर,विजय पवार,अनिल चौगुले,जयश्री भामरे मॅडम,ज्योती निखाडे मॅडम व क्रीडा विभाग प्रमुख दादासाहेब ढाकणे यांची उपस्थिती होती. अशी माहिती विद्यालयाचे दादासाहेब ढाकणे यांनी दिली.
बातमी शेअर करा