Advertisement

 मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर ३०० युनिट वीज मोफत मिळणार

प्रजापत्र | Friday, 19/04/2024
बातमी शेअर करा

मोदींच तिसऱ्यांदा सरकार आलं, तर मोफत ३०० युनिट वीज मिळणार, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज धाराशिवाय येथे प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

 

ते म्हणाले आहेत की, गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा शेतकऱ्यांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकली आणि पाहिलं बिल दिलं शून्याचे. मात्र नंतर पुन्हा आधी सारखे बिल देण्यास सुरुवात झाली. म्हणाले परवडत नाही. मात्र मोदी हे कुठलंही काम करतात, ते मागील पुढील विचार करून करतात.

Advertisement

Advertisement