Advertisement

केज निवडणूक विभाग चालतोय कासव गतीने......! केज वगळता जिल्ह्याचे चित्र स्पष्ट......!

प्रजापत्र | Tuesday, 05/01/2021
बातमी शेअर करा

 

केज दि.५ - तालुक्यातील सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांना विहित वेळेत माहिती  दिली जात नसल्याने निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार दिसून येत असून एवढी कासव गती का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

              केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दि. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून त्यामुळे तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. तसेच काही गावातील काही प्रभागातील निवडणूका सुद्धा बिनविरोध झालेल्या आहेत. दरम्यान ही सर्व माहिती तालुक्यातील नागरिकांना ज्ञात होण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांना विहित कालावधीत देणे आवश्यक असते. मात्र असे असतानाही एक दिवस उलटून गेला तरी अद्याप या बाबत अधिकृत माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेली नाही. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तेथील चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु केज तालुक्यातील निवडणुकी संदर्भातील वृत्त अद्याप पर्यंत प्रकाशित झालेले नाही. निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही त्यांनी  माहिती संदर्भात प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाविषयी नागरिक संभ्रमित  झाले आहेत.

      दरम्यान दुसऱ्या दिवशी सुद्धा मीडियाचे प्रतिनिधी तहसीलदार व निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क करत होते मात्र कॉल स्वीकारले नाहीत. 

हेही वाचा 

Advertisement

Advertisement