Advertisement

येत्या 10 दिवसात लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता - आरोया मंत्री

प्रजापत्र | Tuesday, 05/01/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली  : कोरोना लसीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या 10 दिवसात देशात लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना वॅक्सिन वापरण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 10 दिवसानंतर ही लस देता येऊ शकते, आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातील विविध राज्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे 3 जानेवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हशील्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोवाक्सिन' यांना आपत्कालीन परिस्थितीत लसीचा वापर करण्यास परवानगी दिली.

 

आरोग्य मंत्रालयाने पुढे म्हटले की, दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या कमी होऊन 3 टक्क्यांच्या खाली आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या अडीच लाखांवर आली आहे. त्यापैकी केवळ 44 टक्के रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत तर 56 टक्के घरात क्वॉरंटाईन आहेत, जी असिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. गेल्या आठवड्यात भारतात प्रति लाख लोकसंख्येमध्ये केवळ 96 रुग्ण आढळले, तर दर 10 लाखांमागे एक मृत्यू झाला आहे.

हेही वाचा 

 

देशात लस देण्याची प्रक्रिया कशी होईल?

लसीवर डिजिटली देखरेख ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. या प्रक्रियेत, बल्क डेपोमध्ये लसीच्या साठवणी दरम्यान तापमानाचे परीक्षण देखील केले जाते. मात्र कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत, जे सरकारला सतत आणि सर्वसमावेशक देखरेखीची क्षमता देतात. लसीच्या पहिल्या व दुसर्‍या डोससाठी डिजिटल माध्यमातूनच तारीख दिली जाईल. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत युनिक हेल्थ आयडीदेखील तयार करता येतील. हे डिजिटल प्लॅटफॉर्म चालवणार्‍या लोकांकडे 24 ×7 हेल्पलाईन सुविधा असेल.

Advertisement

Advertisement