Advertisement

सात वर्षीय बालिकेवर चुलत भावाचा अत्याचार

प्रजापत्र | Thursday, 14/08/2025
बातमी शेअर करा

जालना : जालना शहरातील सात वर्षाच्या बालिकेवर १४ वर्षीय सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना नवीन जालना भागात घडली. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     नवीन जालना भागात एका ७ वर्षाच्या बालिकेवर तिच्याच १४ वर्षीय सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली . अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्या मुलीला तातडीने आईने प्रारंभी खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर घटना पोलिसांना कळवून त्या मुलीवर तातडीने उपचार सुरू केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, पिंक मोबाईल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतेली. पोलिसांनी पीडित मुलगी व आईचे जवाब घेत तक्रार नोंदवून घेतली आहे.

याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पीडित मुलीचा चुलत भाऊ चौदा वर्षीय विधिसंघर्ष बालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement