Advertisement

दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन संपविले जीवन

प्रजापत्र | Thursday, 14/08/2025
बातमी शेअर करा

केज दि.१४(प्रतिनिधी): तालुक्यातील सांगवी (सा.) येथे ७० वर्षीय शेतकऱ्याने गोठ्यात तर कोरेगाव येथे ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटना बुधवार (दि.१३) रोजी सायंकाळी उघडकीस आल्या. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
       सांगवी (सा.) येथील पांडुरंग विठ्ठल केदार (वय ७०) या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत बुधवारी दुपारी शेतातील गोठ्यात आडूला धोतराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तर दुसऱ्या घटनेत कोरेगाव येथे बाळू कारभारी साबळे (वय ४०) या शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेऊन शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. 

Advertisement

Advertisement