Advertisement

लातूर–मुंबई व बिदर–मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला ३ अतिरिक्त डबे

प्रजापत्र | Saturday, 20/06/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.२०(प्रतिनिधी): प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लातूर–मुंबई आणि बिदर–मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांमध्ये ३ अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2 Tier), एक वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier) आणि एक स्लीपर क्लास डबा समाविष्ट आहे.

या वाढीमुळे गाडीची प्रवासी क्षमता वाढणार असून प्रवाशांना आरक्षण मिळणे अधिक सुलभ होणार आहे. सध्या या गाड्यांमध्ये २१ ICF डबे असून अतिरिक्त डबे जोडल्यामुळे गाडीची रचना २४ ICF डब्यांची होणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 22107 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–लातूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये २५ जून २०२६ पासून, 22108 लातूर–मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये २६ जूनपासून, 22143 मुंबई–बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये २६ जूनपासून आणि 22144 बिदर–मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये २७ जून २०२६ पासून अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे मराठवाडा आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

Advertisement