Advertisement

ऊस दरवाढीसाठी बीडमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

प्रजापत्र | Saturday, 21/11/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२१(प्रतिनिधी): ऊस दरवाढीच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.शेतकरी पुत्र रविराज साबळे,विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाडळसिंगी टोलनाक्यावर आंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी टोलनाका बंद करत ऊसाला योग्य दर देण्याची मागणी केली.त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  पाडळसिंगी टोलनाका येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत ऊस दरवाढ करावी आणि दुष्काळी परिस्थितीत हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी आंदोलकांनी केली आहे. ऊसाला प्रति टन ४२०० रुपये भाव द्यावा तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन गेल्या दोन तासांपासून सुरू आहे. यामुळे धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असुन प्रशासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून २६ नोव्हेंबर रोजी आयुक्त कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीत या संदर्भात बैठक होणार असल्याने तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement