डी. डी. बनसोडे/केज
नाशिक दि.४ - राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा
नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली करण्यात आली. या लग्नात सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, ज्यांनी कायद्याचे पालन करायचं असतं तेच जर अशा प्रकारे उपस्थित राहून कायद्याची पायमल्ली करत असल्यास सामान्य माणसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचा आदर्श ठेवायचा, असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे.