Advertisement

तीस हजाराची लाच स्वीकारताना कारकून पकडला

प्रजापत्र | Wednesday, 24/01/2024
बातमी शेअर करा

माजलगाव - येथील उपविभागीय कार्यालयातील  कारकुनास तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी रंगेहात पकडण्याची घटना बुधवार दि. २४ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

 

पकडलेले वाळूचे वाहन सोडविण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी उपविभागीय कार्यालय माजलगाव येथील कारकून वैभव बाबुराव जाधव यास सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दि २४ दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ पकडले. यावेळी एसडीएम नीलम बाफना या जेवण करत होत्या व कारवाई होत असल्याचे कळताच त्या पटकन तेथून एका खाजगी मोटरसायकलवर फरार झाल्याचे येथील काही उपस्थितांनी सांगितले.

 

 

Advertisement

Advertisement