शिरूर दि. २४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील लोणी येथे संत.खंडोजीबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुरू असलेल्या सप्ताहाची सांगता मंगळवार दि. २३ होती काल्याच्या किर्तनासाठी घरातील सर्व व्यक्ती किर्तन ऐकण्यासाठी व प्रसादासाठी गेले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील सप्ताहास भेट देण्यासाठी आले असल्याची संधी साधत सरपंच यांच्या कामावर असलेल्या दोघांनी घराचा दरवाजा लोखंडी टिकावाने तोडून कपाटात असलेली रक्कम पळविली ज्यांच्यावर संशय होता व तो खरा ठरला असल्याने दोन्ही आरोपी पोलीसाच्या ताब्यात आहेत .
सविस्तर माहिती अशी कि,सरपंच किसनदेव महादेव बडे यांनी शेतक-याकडून खरेदी केलेला कापुस पाडळसिंगी फाट्यावर विक्री करून आलेले पैसे कपाटात ठेवल्याची माहिती असल्याने आरोपीने घरात कुणीच नसल्याचे पाहून घर फोडून चोरी केली माळवदारून दोघे पळून जात असल्याचे सरपंचाचे पुतने गणेश बडे यांनी पाहिले व चुलते किसनदेव यांना फोन करून सांगितले दरम्यान आरोपी पळून गेले असले तरी चोरी यांनीच केल्याची खात्री झाल्याने संशयीत म्हणून किसनदेव बडे यांनी फिर्याद देत असतांना सांगितले त्यांना पोलीसांनी ताब्यात देखील घेतले .
लोखंडी टिकावाने दरवाजा तोडून एक लाख दहा हजार रोख चोरी गेल्याची फिर्याद किसनदेव बडे यांनी दिल्यावरून पोलीसांनी आरोपी गणेश भाऊसाहेब साबळे व जावेद अब्दुल शेख या दोघास ताब्यात घेतले असुन कलम ४५४ व ३८० प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
.