Advertisement

बशीरगंजमधील गुटख्याच्या गोडाउनवर छापा 

प्रजापत्र | Monday, 09/03/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.९(प्रतिनिधी):शहरातील बशीरगंज परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच सोमवार (दि.९) रोजी दुपारी कारवाई करत १,६०,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

    बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध गुटखा,वाळू यावर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू असून बीड शहरातील बशीरगंजमध्ये शेख इरफान जब्बार रा.जुनी भाजी मंडई बुंदेलपुरा,बीड हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सलमान रफिक बागवान रा.बशीरगंज,बीड याच्या सांगण्यावरून स्वतःच्या फायद्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच सोमवार (दि.९) रोजी दुपारी  १२.४५ च्या सुमारास सदरील ठिकाणी कारवाई केली असता १,६०,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख इरफानला  धटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले तर सलमान रफिक बागवान हा फरार झाला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.ह. युनूस बागवान,गोविंद राख,अंकुश वरपे,स्वाती मुंडे,अशपाक सय्यद,मनोज परजणे,बबन सलगर,चालक नितीन वडमारे यांनी केली.

Advertisement

Advertisement