Advertisement

 माजलगावच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मृत्यु  

प्रजापत्र | Wednesday, 17/01/2024
बातमी शेअर करा

माजलगाव -  शिवाजी नगर येथील शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते सतीश बोटे यांचा अपघातात जागीच मृत्यु झाल्याची घटना आज चार वाजण्याच्या सुमारास घडून आली.

 

अधिक माहिती अशी कि, परभणी रोडवरून आपल्या दुचाकीवरून ओव्हरटेक करत असताना समोरून अचानक वाहन आल्याने पाठीमागून येणाऱ्या बसला त्यांची जोराची धडक बसली जोराच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यु झाल्याचे समजते. सदरील घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वांशी मनमिळावू असे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख होती.

Advertisement

Advertisement