Advertisement

३२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग;पोलिसात गुन्हा दाखल

प्रजापत्र | Tuesday, 09/01/2024
बातमी शेअर करा

माजलगाव - माझ्यासोबत प्रेम संबंध ठेव, नाहीतर तुझ्या पतीला सांगेल की तुझे आणि माझे तीन वर्षापासून प्रेम संबंध होते. असे धमकावत एका ३२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना तालुक्यातील केसापुरी शिवार येथे शनिवार दि.६ रोजी सकाळी घडली. दरम्यान आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी कि,पीडित महिला केसापूरी शिवारातील एका शेतामध्ये दि.६ रोजी सकाळी १० वाजता एकटीच शेतीचे काम करत होती. याचा फायदा घेत विठ्ठल जबू खेत्री हा महिलेजवळ आला व म्हणाला की माझ्यासोबत संबंध ठेव.नाही तर तुझ्या नवऱ्याला सांगेल कि, तुझे आणि माझे जुने प्रेम संबंध आहेत. असे म्हणत विठ्ठल याने वाईट हेतूने महिलेचा हात धरला व तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. दरम्यान समोरील महिलेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शिवीगाळ करत महिलेला धमकावत विठ्ठल त्याठिकाणाहून निघून गेला. याप्रकरणी विठ्ठल जब्बू खेत्री याच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसात सोमवार दि.८ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास एएसआय प्राधान हे करत आहेत.

Advertisement

Advertisement