Advertisement

नवीन वर्षात टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्तात फास्टॅगची अंमलबजावणी

प्रजापत्र | Wednesday, 30/12/2020
बातमी शेअर करा

बीड   : केंद्र सरकारने 1 जानेवारी 2021 पासून टोलनाक्यावरील टोल वसुली संपूर्णत: ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टोलनाक्यावरुन फास्टॅगशिवाय कोणतेच वाहन जावू शकणार नाही. अजूनही अनेक वाहनधारकांकडे फास्टॅग नोंदणी नाही त्यामुळे 1 जानेवारी पासून टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्तात फास्टॅगची अंमलबजावणी केली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील टोलनाक्यांवर पोलीस संरक्षण देण्यासाठी यापूर्वीच महामार्ग प्राधिकरणाने पोलीस अधिक्षकांना पत्र दिले आहे. 

देशभरात 1 जानेवारीपासून टोलनाक्यावर फास्टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून कोणत्याच टोलनाक्यावर रोख स्वरुपात टोल स्विकारला जाणार नाही. ज्या वाहनधारकांकडे फास्टॅग नाही अशांना टोल नाक्याच्या परिसरातच फास्टॅग उपलब्ध करुन देण्याची यंत्रणा ठेवली जाणार आहे. 15 जानेवारीपर्यंत टोलनाक्याच्या परिसरात फास्टॅग नोंदणी करुन देणारी यंत्रणा अस्तित्वात असेल मात्र कोणत्याही परिस्थितीत रोख स्वरुपातील टोल स्विकारला जाणार नाही. या काळात टोलनाक्यावर वाहतूक विस्कळीत होऊ नये किंवा प्रवाश्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी महामार्गावर पाडळसिंगी नजीक टोलनाका आहे तर अंबाजोगाई तालुक्यातही सोमवारपासूनच टोलवसुली सुरु झालेली आहे.

 

हेही वाचा 

Advertisement

Advertisement