Advertisement

ब्रिटन भारत विमान सेवेवरील बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली

प्रजापत्र | Wednesday, 30/12/2020
बातमी शेअर करा

दिल्ली : ब्रिटन मध्ये कोरोनाच्या नवीन प्रकार समोर आल्यावर भारत सरकारने खबरदारी म्हणून भारत -ब्रिटन विमानसेवा बंद केली होती. पण त्यापूर्वी ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांची कोरोनाची चाचणी केली असता त्या प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवीन विषाणूचे अंश आढळून आले. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

हेही वाचा 

                    करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. ब्रिटन-भारत ब करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही नव्या करोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून करोनाच्या नव्या विषाणूनं देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या आज (३० डिसेंबर) २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

 

Advertisement

Advertisement