Advertisement

 राष्ट्रवादीच्या नेत्यांना नवीन वर्षात मोठं गिफ्ट

प्रजापत्र | Thursday, 07/12/2023
बातमी शेअर करा

नागपूर- हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती  राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी  दिली आहे. अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्री पद वाट्याला येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना नववर्षात  मोठं गिफ्ट मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. 

 

 

हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राज्याचा तिसरा टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण होईल. या विस्तारामध्ये राष्ट्रवादीला तीन मंत्रीपदं म्हणजे एक कॅबीनेट आणि दोन राज्यमंत्री पद  मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे महामंडळांचे वाटप करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांचे नव वर्ष  आनंदात सुरू होणार असल्याच्या चर्चा  म्हटलं जातय. महायुतीच्या सरकारचं अद्याप मंत्रीमंडळाचे वाटप बाकी आहे. म्हणून या विस्तारामध्ये अजूनही महामंडळाचे वाटप होण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा- संपादकीय अग्रलेख   https://prajapatra.com/9036

Advertisement

Advertisement