Advertisement

शेतकऱ्यांचा राष्ट्रीय दिवस आणि सद्यस्थिती.

प्रजापत्र | Wednesday, 23/12/2020
बातमी शेअर करा

 सचिन देशमाने

 बीड : वीसाव्या शतकात मानवाने खूप प्रगती केली असली तरी मानव अन्न आणि पाण्याशिवाय जगू शकत नाही.मानवाच्या जगण्यासाठी पाणी व अन्न हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत.निसर्गाच्या कृपेने पृथ्वीवर पाणी मुबलक असले तरी अन्न तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची गरज लागते.म्हणजेच ही पृथ्वी शेषणगाच्या मस्तकावर तरलेली नसून शेतकऱ्यांनि पिकवलेल्या अन्नावर जगत आलेली आहे.आज अश्याच दिवसरात्र कष्ट करून अन्न निर्माण करण्याचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा दिवस म्हणजे राष्ट्रीय शेतकरी दिवस.

देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्म दिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.चौधरी यांच्या कारकिर्दीत ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे.त्यांनी शेतकऱ्यांचा भवितव्यासाठी अनेक धोरणांची सुरवात केली होती.त्यांच्या या योगदानाला लक्षात घेऊन भारत सरकारने 2001 पासून त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरी करण्यास  सुरुवात केली.

हा दिवस शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे याची जाणीव व्हवी म्हणून साजरा केला जातो .पण भारतीय शेतकऱ्यांचा विचार केला तर अशे कित्येक शेतकरी दिवस आले पण आणि गेले पण तरी शेतकऱ्यांचे प्रश्न काही संपले नाहीत.अजूनही देशात विविध भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे.शेतीच्या खर्चापाई शेतकरी कर्ज काढतात आणि शेतात पीक घेतात. पण बाजारपेठेत मालाला भाव मिळाला नाही की शेतकऱ्यांना कर्ज फेडणे लांबच तर स्वतःचा घरच्या प्रपंच सांभाळणे ही अवघड होऊन बसते आणि उपासमारीची वेळ येते.कधी नैसर्गिक आपत्ती मुळे शेतीचे नुकसान होते तेव्हा सुद्धा सरकार कढुन शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी होऊन निराशाग्रस्त होतो आणि आत्महत्या हा पर्याय निवडतो.

मागील काही दिवसापासून जवळपास एक महिन्यापासून भारतातील विविध भागातील शेतकरी हा सिंघु बॉर्डर वरती आंदोलनाला बसलेला आहे.त्याचे कारण असे की मोदी सरकारनी संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी बिलांना शेतकऱ्यांचा विरोध आहे.शेतकऱ्यांच्या मते हे बिल भांडवल दारांच्या हिताचे असून या बिलामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक  होईल त्यामुळे हे बिल रद्द करावे अशी मागणी आंदोलन करणाऱ्या व भारताच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.मात्र मोदी सरकार हे बिल रद्द होऊ शकत नाही याची रट लावून बसले आहे.शेकऱ्यांसोबत वारंवार बैठका होऊन सुद्धा मोदी सरकार आपली भूमिका सोडायला म्हणजेच हे तीन कृषी बिल रद्द करायला तयार होत नाही आहे.आणि हजारो शेतकरी हे बिल रद्द व्हावे म्हणून घरदार सोडून आपल्या आरोग्याची काळजी न करता आंदोलनाला बसले आहेत.महिन्यापासून चालू असलेल्या या आंदोलनात काही शेतकरी मृत्यू ही पावले आहेत .आजच्या शेतकरी दिवस आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश असूनही स्वतःच्या प्रश्नांसाठी शेतकरी सिंघु बॉर्डर वर आंदोलन करतांना आपले प्राण गमवत आहेत ही कृषिप्रधान देशास खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या मालाला भाव आणि त्यांच्या उपयोगी कायदे तयार करणे गरजेचे आहे तेव्हा कुठे बळीराजा सुखी होईल.
 

 

Advertisement

Advertisement