परळी: शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या साई कुलर या कारखान्यास बुधवारी (दि.२३) सायंकाळी अचानक आग लागल्याने लाखोंचे या आगीत नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत सोळंके बंधू यांचा साई कुलर नावाचा कुलर उत्पादन करणारा कारखाना आहे. या कारखान्यास बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट व धुरामुळे कारखान्यातील कामगारांना आग विझवता आली नाही. पाहता-पाहता आगीने अवघ्या १५ मिनिटात रौद्र रूप धारण केले.या कारखान्यात प्लास्टिक,लोखंडी कुलर बनवले जातात. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या काळात कुलर तयार करुन ते उन्हाळी हंगामात विकले जातात. दरम्यान आगीमुळे कारखान्यातील ८०लाख रुपयांचा कच्चा व इतर माल जळून खाक झाल्याचे सोळंके यांनी सांगितले आहे.आग विझवण्यासाठी परळी नगर पालिकेचे अग्निशामक दल प्रयत्न करत असून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा