बीड-गेवराई शहरातील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चलविणाऱ्यांना पोलीस अधिक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी ताब्यात घेतले आहे. आजच्या या कारवाईत हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सपोनि गणेश मुंडे यांनी पोलीस अधिक्षक पथक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात कारवाईची जोरदार मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसपींचे पथक सातत्याने कारवाया करताना दिसून येते. आज (दि.१६) गेवराईच्या बसस्थानकानजीक कल्याण नावाचा मटका घेताना दोन बुकी मालक व चार आरोपी असे सहा जणांना गणेश मुंडे यांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकारणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बातमी शेअर करा