बीड-गेवराई तालुक्यातील गोदापात्र असणाऱ्या हिंगणगाव शिवारात पोलीस अधिक्षक पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोदापात्रात वाळूमाफियाविरुद्ध गणेश मुंडे यांनी केलेल्या कारवाईची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
पोलीस अधिक्षक यांच्या पथकाचे प्रमुख असलेले गणेश मुंडे यांनी अवैध धंद्याविरोधात सुरु केलेली कारवाईची मोहीम आता अधिक गतिमान झाली आहे. आज हिंगणगाव शिवरातील गोदापात्रात छापा मारून ६ टॅक्टर,७ केन्या,४ मोटारसायकल,३०० ब्रास वाळूसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान गणेश मुंडे यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
बातमी शेअर करा