Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - माध्यमांनीच करावे आत्मपरीक्षण

प्रजापत्र | Monday, 18/09/2023
बातमी शेअर करा

जर कोणी एकांगी वृत्तांकन करणार असेल, किंवा आम्हाला हवे तेच बोला अशी हेकेखोरी करणार असेल, तर त्यांच्या कार्यक्रमांना जायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला, मग ती सार्वजनिक जीवनातली असो किंवा नसो आहेच. त्यामुळे इंडिया आघाडीने काही वृत्त निवेदकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालणे यात लोकशाही विरोधी असे काही नाही. उलट अशी वेळ का आली याचा विचार आणि आत्मपरीक्षण माध्यमांनी करणे आवश्यक आहे.

 

इंडिया आघाडीमधील पक्षांनी दफदेशातील ११ वृत्त निवेदकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या निर्णयाची मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु आहे. या वृत्त निवेदकांवर घातलेला बहिष्कार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर घातलेला बहिष्कार असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न या माध्यमातून गोदी मीडिया करीत आहे. या गोदीमिडीयाने सुरुवातीपासूनच त्यांना हवे तसे नेरेटिव्ह स्थापित करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, आणि आता देखील काही मूठभर लोकांच्या आक्रस्ताळेपणाला लपविण्यासाठी ते मध्यमस्वातंत्र्याची ढाल पुढे करीत आहेत.

 

मुळात इंडिया आघाडीने कोठेही माध्यमांबद्दल काही अनुद्गार काढले नाहीत, किंवा आम्हला माध्यमांची आवश्यकता नाही असेही म्हटलेले नाही. केवळ काही लोकांच्या कार्यक्रमांना आमचे कोणीही प्रवक्ते येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. असेही कोणाच्या कार्यक्रमांना कोणी जायचे कि नाही, हे ठरविण्याचा अधिकार निश्चितपणे ज्या त्या व्यक्तीचा आहे, आपण एखाद्या चर्चेला अमुक व्यक्तीने आलेच पाहिजे अशी सक्ती कशी करू शकतो ? जिथे देशाचे पंतप्रधान, ते ज्या सभागृहाला उत्तरदायी आहेत , त्या सभागृहात बोलणे टाळतात, पत्रकार परिषद  टाळतात, त्यावर कोणी काही बोलत नाही, मात्र जे निवेदक एकांगी वृत्तकन करतात , समोरच्या व्यक्तीचा केवळ राजकीय द्वेषातून उपमर्द करतात, त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यावर तो माध्यमांवरील बहिष्कार कसा ठरेल ?

 

मुळात माध्यमांनी जी सर्वसमावेशक भूमिका घयायला हवी, ती भूमिका आज माध्यमे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया घेत आहे का ? काही निवेदक सरकारचे भाडोत्री असल्यासारखे समोरच्यावर, विरोधी पक्षांच्या पर्व्हकट्यावर अक्षरशः ओरडत असतात, त्यांना बोलायची संधी देत नाहीत, स्वतःचा अजेंडा रेतनायचा नव्हे थोण्याचा अट्टाहास त्यांचा असतो, मग अशांच्या कार्यक्रमांना आम्हाला जायचे नाही अशी भूमिका कोणी घेत असलतील तर त्यात वावगे ते काय ? अशी वेळ का आली, याचा विचार आतातरी असल्या भाडोत्री निवेदकांनी करायला हवा. चर्चेच्या मंचावर चर्चा सर्वांगीण व्हायला पाहिजे, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार माध्यम म्हणून नक्कीच आहे, मात्र त्याचे उत्तर तुम्हाला हवे तसेच दिले पाहिजे अशी भूमिका कशी घेता येईल, ही तर हुकूमशाही झाली, मागच्या काही काळात काही माध्यमांनी हेच तर चालवले आहे आणि त्यामुळेच लोक माध्यमांना टाळू लागले आहेत. तुमचे चॅनल भलेही मोठे असेल, मात्र आम्हाला तुमच्या कार्यक्रमात यायचे नाही असे जेव्हा कोणी सांगत असते, त्यावेळी आपले कोठे चुकतेय याचा विचार करायचा असतो, तितकी संवेदनशीलता आणि नैतिकता ज्यांच्या कार्यक्रमाला आम्ही कोणी जाणार नाही, असा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे, त्या माध्यमांमधील भाटांकडे शिल्लक असेल तर याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. 
 

Advertisement

Advertisement