Advertisement

 आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक

प्रजापत्र | Friday, 21/11/2025
बातमी शेअर करा

 नाशिक : विकृत मानसिकतेचा बळी ठरलेल्या डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांकडून या घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आज मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला मालेगावकरांनी उदंड प्रतिसाद ही दिला. या बंददरम्यान मोर्चेकऱ्यांकडून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पण या जन आक्रोशमोर्चाला आंदोलकांकडून हिंसक वळण लागले. मोर्चेकर्ऱ्यांनी यावेळी मालेगाव न्यायालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला.

   या प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार होते, मात्र प्रचंड जनक्षोभ, लोकांचा संतापामुळे मालेगाव शहरातील वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध काढण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले आहे. चिमुकल्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला जाहीर फाशी द्या अशीच प्रत्येकाची मागणी असून मालेगाव कोर्टाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement