Advertisement

आणखी एक लाचखोर पकडला

प्रजापत्र | Wednesday, 30/08/2023
बातमी शेअर करा

शिरूर कासार-येथील नगररचनाकार अंकुश लिमगेसह एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजारांची लाच घेताना आज (दि.३०) बीडमध्ये पकडले आहे.

 

   शिरूर नगरपंचायतच्या हद्दीतील ऑनलाईन बांधकाम परवान्यासाठी  नगररचनाकार अंकुश लिमगे यांनी तक्रारदारकडे ४० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिमगे व अन्य एका व्यक्तीला पकडले आहे.सध्या याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी दिली.  

 

 

Advertisement

Advertisement