Advertisement

व्हिस्टा कारचा भीषण अपघात

प्रजापत्र | Friday, 25/08/2023
बातमी शेअर करा

 

शिरूरकासार - तालुक्यातील मानूर जवळ  झालेल्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

 

तागडगाव येथील नाईकनवरे कुटुंबीय मोहटादेवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडीने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या गाडीचालक गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे (वय-४०) आणि दिव्या अजिनाथ मडके (वय- ८) महिने यांचा या अपघातात मृत्यु झाला असून लताबाई अंबादास नाईकनवरे,उषाबाई गोकुळ नाईकनवरे (वय-३५) दादा गोकुळ नाईकनवरे (वय-१४) प्रगती गोकुळ नाईकनवरे (वय-१५) कोमल अजिनाथ मडके (वय-२४) आणि बाळू मच्छिंद्र सटले (वय-१८) हे सहा जण जख्मी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (एम.एच.१६ जी १६५५) क्रमांकाच्या व्हिस्टाचा अपघात एवढा भीषण होता की,गाडीने दोन-तीन पलट्या घेत रस्ता सोडला. चालक गोकुळ नाईकनवरे हे जागीच ठार झाले तर दिव्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब शिरसाट हे करत आहेत. 

Advertisement

Advertisement