Advertisement

राजकीय कुरघोडीत अडकला माजलगावचा विकास

प्रजापत्र | Friday, 18/12/2020
बातमी शेअर करा

माजलगाव   : माजलगाव नगरपालिकेला आतापर्यंत कधीच मिळाला नव्हता इतका निधी मागच्या चार वर्षात मिळाला. वेगवेगळ्या योजनांमधून आणि पुरस्काराच्या माध्यमातून नगरपालिकेला निधी मिळाला तरी पालिकेतील पदाधिकार्‍यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे या निधीतून शहराच्या विकासाची भरीव कामे होऊ शकलेली नाहीत. शहराच्या अंतर्गत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे असताना चांगले रस्ते देखील या चार वर्षात पालिकेला करता आले नाहीत. त्यामुळे आता उरलेल्या कार्यकाळात तरी शहराचा विकास होणार का हा प्रश्‍न आहे.
                  माजलगाव नगर परिषदेस जवळपास 50 कोटी पेक्षा अधिक विकास निधी मंजूर करण्रात आला होता त्रातून शहराचा अक्षरशः कारापालट झाला असता शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच असल्राने आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असल्राने शहराचा अंतर्गत आणि बाह्य विकास होणे आवश्रक होता परंतु इतका निधी रेऊन देखील शहराची स्थिती हि जैसे थें च राहिली नगर पालिका पदाधिकार्‍रांच्रा कार्रकाळ बघता बघता चार वर्षे पूर्ण झाला शेवटच्रा टप्प्रात तरी हा विकास निधी ज्रा कामी आला आहे त्रासाठी रोग्ररित्रा वापरण्रात रेईल का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरांतील 111 अंतर्गत रस्त्राला नूतनीकरण मंजुरी नगर परिषद सभागृहाने दिली आहे.सद्य स्थितीत अंतर्गत रस्तेच नसल्राने शहरातील नागरिकांचे मणके ढिले झाले आहेत.पाईपलाईन च्रा कामाने अनेक प्रभागातील रस्ते हे खोदल्राने रस्त्राचे तीनतेरा वाजले असून रस्त्रावर्। नजर जाईल तिकडे खड्डे दिसून रेत आहेत.शेवटच्रा टप्प्रात तरी हा विकास निधी खर्च होऊन शहरात दर्जेदार रस्त्राची निर्मिती करण्रात पालिका पदाधिकारी रशस्वी व्हावेत अशी अपेक्षा जनता करत आहे.

लोकप्रतिनिधींकडूनही विकासाला खो
एखाद्या कामासाठी आलेला निधी त्रा कामासाठीच खर्च होणे आवश्रक असताना गेली चार वर्षे मात्र अनिरमिततेचा कळस पालिकेत पाहारला मिळाला. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील विकासाला खो देत राहिल्राने शहर भकास स्थितीत रेऊन पोहचले आहे. आ.प्रकाश सोळंके यांनी खरेतर पालिकेला गती देणे अपेक्षित होते मात्र त्यांनी देखील आतापर्यंत पालिकेत केवळ राजकारणच केले. आता पालिका त्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आता तरी ते विकासाला गती देणार का हा प्रश्‍न आहे.

Advertisement

Advertisement