मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने राजकारणात घडामोडी सुरू आहेत. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर आता मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढवणार असल्याचंही या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं आहे.
बातमी शेअर करा

