Advertisement

एसटी-दुचाकीच्या धडकेत एक ठार 

प्रजापत्र | Sunday, 28/12/2025
बातमी शेअर करा

नेकनूर दि.२८(वार्ताहार): एसटी व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी (दि.२८) सकाळी ११:३० च्या सुमारास अहमदपूर-नगर महामार्गावर नेकनूर जवळ घडली आहे. जखमीला बीड येथे सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, मयताचे शवविच्छेदन नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

       किशोर निर्मळ (वय ५५ वर्ष) रा. नेकनूर असे मयताचे नाव असून जखमीचे नाव समजू शकले नाही. हे दोघेजण दुचाकी क्रमांक एम. एच. ४४ ए डी ३६६६ वरुन जात असताना नेकनूर जवळ नादेड जिल्ह्यातील देगलूर अगारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एम. एच. २० बी एल ४०५२ ची धडक झाली. यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीस्वारांना गंभीर मार लागून यामध्ये किशोर निर्मळ यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थितांनी मदत करुन जखमीला बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.  

Advertisement

Advertisement