Advertisement

चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा विरोधात धडाकेबाज कारवाई

प्रजापत्र | Saturday, 12/08/2023
बातमी शेअर करा

चकलांबा - येथील गोदावरी नदी पात्रात गणपती मंदिरा समोर दोन हायवामध्ये चार लोडर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी पात्रातील वाळुचा अवैधरित्या उपसा करीत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली कि, लगेच त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी कि, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले मौजे राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रात गणपती मंदिरा समोर दोन हायवामध्ये चार लोडर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी पात्रातील वाळुचा अवैधरित्या उपसा करुन तिची चोरटी वाहतुक करित आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन आज (दि.१२) रोजी सकाळी ८ च्या दरम्यान सदर ठिकाणी छापा मारला आसता गोदावरी नदी पात्रात चार लोडर (ट्रॅक्टर) हे नदीपात्रातील वाळुचा उपसा करुन दोन हायवामध्ये भरत असताना मिळुन आले. तेव्हा रेडपार्टीतील चौघांनी दोन हायवा व दोन लोडर (ट्रॅक्टर) चालक यांना जागीच पकडले सदर कारवाई करीत असतांना आणखी नदी पात्रातुन वाळुचा उपसा करीत असलेले दोन लोडर ट्रॅक्टर हे रेड पार्टीस पाहुन पळुन गेले. व मिळुन आलेल्या १) हायवा टिप्पर क्रमांक. (एमएच १५ एफव्ही ६३९०) (हायवा किंमत ३० लाख) च्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- शेरखाँ बाबु पठाण (वय-३५) व्यवसाय - चालक रा.घोडका राजुरी ता.जि.बीड, २) हायवा क्रमांक. (एमएच ४४-९१३२) ( हायवा किंमत ३० लाख) चे चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख साबेर शहाबुद्दीन (वय-२२) व्यवसाय-चालक रा.नांदुर हवेली ता. जि. बीड असे सांगीतले, ३)लोडर ट्रॅक्टर क्रमांक. (एमएच२३ बीएच १४८६) (लोडर ट्रॅक्टर किंमत १२लाख) च्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदिप अंकुश पोटफोडे (वय-३०) रा.राक्षसभुवन ता.गेवराई ४)लोडर ट्रॅक्टर क्रमांक. (एमएच २१ बीव्ही ४८४५) (लोडर ट्रॅक्टर किंमत १२लाख) यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश भालचंद्र कोंढरे (वय-३५) राराक्षसभुवन ता. गेवराई जि.बीड असे सांगितले, पळुन गेलेल्या लोडर ट्रॅक्टर चालकांचे नाव ५) अजय सखाराम कोंढरे ६) बाळासाहेब तात्यासाहेब नाटकर दोन्ही रा. राक्षसभुवन ता. गेवराई असे असुन, पळुन घेवुन गेलेल्या रोडर ट्रॅक्टरचा नंबर दिसला नाही. या कारवाईत एकूण ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून वरील आरोपींच्या विरुध्द चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अनंता तांगडे हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई हि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, मा.उपविभागीय अधीकारी नीरज राजपुरु यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि नारायण एकशिंगे व सोबत पोउपनि अनंता तांगडे ,पवळ यांनी केली.

Advertisement

Advertisement