Advertisement

राक्षसभुवन येथे अवैध वाळू तस्करी करणारी वाहने पकडली

प्रजापत्र | Monday, 03/07/2023
बातमी शेअर करा

 

गेवराई - अवैध वाळू उपसा जोमात सुरू असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवाया वरून दिसत आहे. आयएएस आदित्य जीवने व सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सोमवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास वाळू माफिया, वाहतूकीसाठी लोकेशन देणारे लोकेशन बॉय यांना ताब्यात घेत तब्बल 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने वाळू माफियात खळबळ उडाली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली की, गेवराई तालुक्यातील माळस पिंपळगाव राक्षसभवन येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या गोदावरी नदी पात्रातून किनीच्या साह्याने वाळूचा उपसा करून त्याची चोरटी विक्री करण्यासाठी हायवा टिप्पर व ट्रॅक्टरने घेऊन जात आहेत. त्यांनतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बीड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीसचे अधिकारी व कर्मचारी यांनी सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गेवराईकडून बीडकडे वाळूने भरून येणारे दोन हायवा पेंडगाव येथून ताब्यात घेऊन जिल्हाधिकार्यालय बीड येथे लावण्यात आले. त्यानंतर पुढे राक्षसभवन येथे कारवाई करण्यासाठी जात असताना सावरगाव शिवारात येडेश्वरी देवी मंदिराजवळ वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर पोलिसांना पाहून पळवले, तसेच विनानंबरच्या स्कार्पिओ व शिफ्ट कारमधील तरुणांनी त्यांना पकडू नये म्हणून अडथळा केला. पोलिसांनी स्कॉर्पिओ चालक रामेश्वर गलधर, कारमधील अभिजीत सोनवणे, दुचाकीवरील संदीप डाके, ट्रॅक्टर चालक दत्ता शिंदे, मालक अनिल रावडे यांच्यासह तीन दुचाकी, एक स्कार्पिओ, एक स्विफ्ट कार, एक ट्रॅक्टर यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस गेवराई पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी अजय मोराळे यांच्या फिर्यादिवरून कलम 3 कलम 379 /2023 कलम् 379, 186, 201, 34, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी अजय मोराळे, अंगद अडसूळ ल, पोलीसचे पाटील राजेश पाटील, पोह.बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, दिलीप गीते, महादेव भैरवाल, शमीम पाशा यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement