गेवराई - लग्न सराईच्या काळात बसस्थानकात चोरीच्या घटना घडत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेवराई बसस्थानकात पॉकेट, मोबाईल घेऊन पळणारा चोरटा नागरिकांनी पकडला असून त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
गेवराई बसस्थानकात एसटी बसेसला गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन आज सोमवार (दि.०३) रोजी प्रवाशी बसमध्ये चढत असताना पाळत ठेऊन असलेला चोर गर्दीचा फायदा घेत खिशातील पॉकेट आणि मोबाईल चोरून नेत असल्याचे निदर्शनास येताच त्याला लागलीच एकाने पकडले. तेथील नागरिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला. आणि त्याला गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा