Advertisement

मक्याच्या शेतात गांज्याची झाडे

प्रजापत्र | Saturday, 08/04/2023
बातमी शेअर करा

शिरूर कासार - तालुक्यातील मदमापुरी परिसरात मक्याच्या शेतीआड गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती शिरूर पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी काल सांयंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सदरील शेतावर छापा मारला असता मक्याच्या शेतातील मधोमध गांजाची झाडांची जतवणूक केल्याचे आढळून आले. सदरील गांज्याचे झाडे जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 54 हजाराच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. ज्या शेतामध्ये हि कारवाई करण्यात आली ते शेत आरोपींने बटाईने घेतले होते. पोलिसांनी बटाईदार शेतकर्‍याला ताब्यात घेऊन आज न्यायालयासमोर हजर केले आहे. 
तालुक्यातील मदमापुरी शिवारात येथील रहिवाशी ज्ञानेश्वर प्रल्हाद जायभाये याने तेथील एका शेतकर्‍याची 20 गुंठे शेत बटाई करून घेतली त्या शेतात त्याने मका पेरली असून मक्याच्या शेतात गांजा लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांना खबर्‍यामार्फत मिळाली असता.  त्या माहितीच्या आधारे काल (दि.७) रोजी सायंकाळी 4:30 च्या सुमारास पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहायक फौजदार अशोक सोनवणे, सहायक फौजदार वसंत जायभाये, पोलीस हवलदार हनुमंत साळुंके, पो. ह. बाळासाहेब सुरवसे, पो.ह. ना. भाऊसाहेब आहेर, पो. शि. राजेंद्र मुळे, वाहन चालक पो. ह. अफसर सय्यद यांनी नायब तहसीलदार बाळासाहेब खेडकर यांच्या समक्ष मदमापुरी शिवारातील गट नं.07 या शेतात जाऊन छापा मारला असता मकाच्या शेतात गांजाची जवळपास दहा फूट उंचीची झाडे आढळून आले. सदरील झाडांची संबंधित शेतकर्‍याने जतवणूक केल्याचेही आढळून आले. उपस्थित पोलिसांनी हे झाडे उपटून जप्त केले मिळालेल्या गांज्याचे वजन केले असता 5 किलो 400 ग्राम एवढे आहे त्याची बाजारात अंदाजित किंमत 54000 हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या शेताचा बटई धारक ज्ञानेश्वर प्रल्हाद जायभाये यांस अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख हे करत आहेत.

Advertisement

Advertisement