केज दि.२६ (प्रतिनिधी): आमच्या शेतातील या वाटेने तुम्हाला जाऊ देणार नाही असे म्हणत पती-पत्नीला काठी,पाईप,लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी सात जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील तुकूचीवाडी येथील चिंगूबाई चौरे पती आश्रुबा चौरे हे दोघे ते राहत असलेल्या शेतातील घरी जात असताना डोईफोडे वस्ती जवळ त्यांना अशोक एकनाथ डोईफोडे, नामदेव एकनाथ डोईफोडे या दोघांनी अडवून आमच्या वाटेने तुम्ही तुमच्या घराकडे जायचे नाही असे म्हणत .नामदेव डोईफोडे याने चिंगूबाई चौरे व पती आश्रुबा चौरे यांना सोमवार (दि.२३) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास मारहाण केली. तसेच श्रीराम एकनाथ डोईफोडे, त्याची पत्नी स्वाती श्रीराम डोईफोडे, छकुबाई नामदेव डोईफोडे या दोघींनी खाली पाडले आणि प्रिंयका आशोक डोईफोडे हिने गॅसच्या पाईपने,लाथा बुक्यांनी मारहान केली. तर एकनाथ ज्ञानोबा डोईफोडे याने अश्रूबा चौरे यांना मारहान करत जीवे मारण्याची धमकी दिली. चिंगुबाई चौरे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात आशोक एकनाथ डोईफोडे, नामदेव एकनाथ डोईफोडे, श्रीराम एकनाथ डोईफोडे, स्वाती श्रीराम डोईफोडे, छकुबाई नामदेव डोईफोडे, प्रिंयका आशोक डोईफोडे आणि एकनाथ ज्ञानोबा डोईफोडे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.ज.पुरुषोत्तम शेप हे तपास करीत आहेत.

