Advertisement

 सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

प्रजापत्र | Thursday, 26/02/2026
बातमी शेअर करा

मुंबई : अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झालं. अजित पवारांमुळे (Ajit pawar) राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती, सामान्य कुटुंबातून ते आले होते. २०२३ मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar) राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 
 

Advertisement

Advertisement