Advertisement

तो हल्ला बिबट्याचा नव्हे; वनविभागाची माहिती

प्रजापत्र | Wednesday, 02/12/2020
बातमी शेअर करा

बीड-बीडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चर्‍हाट्यामध्ये बुधवारी(दि.2)दुपारी 12 च्या सुमारास इंदू विक्रम माने(वय32) या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा सुरू होती. वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी चर्‍हाट्यामध्ये दुपारी 1.30 वाजता भेट दिली असता त्या महिलेवरील हल्ला बिबट्याचा नव्हे तर अज्ञात प्राण्याचा  असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
चर्‍हाट्यामधील इंदू माने या आपल्या शेतात कापसाला पाणी देत असताना दुपारी 12 च्या सुमारास त्यांच्यावर एका अज्ञात प्राण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या प्रचंड भयभीत झाल्या होत्या. आपल्यावर बिबट्यानेच हल्ला केला आहे. चर्‍हाट्यात बिबट्याचा प्रवेश झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. वनविभागाची पथके आष्टी तालुक्यातून चर्‍हाट्यामध्ये दाखल झाली. वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या प्राण्याचे ठसे पाहिले असता ते बिबट्याचे नसल्याचे सांगितले. तसेच या हल्ल्यात महिलेला दुखापत झाली नव्हती. दरम्यान बीडच्या हद्दीत बिबट्या दिसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या होत्या. वनविभागाच्या भेटीनंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Advertisement

Advertisement