प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एबीपी न्यूजला अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.
अनुपम खेर यांचे ट्वीट
'मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!' हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती' असं ट्वीट करत अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.