Advertisement

'वर्षा'वर चार महिन्यांचे खानपानाचे बील २.३८ कोटी

प्रजापत्र | Sunday, 26/02/2023
बातमी शेअर करा

मुंबई दि.२६ (प्रतिनिधी)-'वर्षा बंगल्याचे 4 महिन्याचे खानपानाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते, परंतु 4 महिन्यातील बील एवढे कसे. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का काही कळायला मार्ग नाही. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक चमकोगिरी करीत आहेत'' असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला.
अजित पवार म्हणाले, गेल्या 8 महिन्यात 50 कोटी सरकारने जाहीरातीवर राज्य सरकारने खर्च केला. मुंबई मनपाकडून माहीती घेतली तर तेथून 17 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केला गेला. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु, पानभर जाहिराती देवून उधळपट्टी होत आहे असे ते म्हणाले.

 

Advertisement

Advertisement