दिल्ली-दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील सीबीआयच्या मुख्य कार्यलयात पोहोचले होते.त्यानंतर दिवसभर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान चौकशीला सामोरे जाण्याआधी ते आप पक्षाचे नेते संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह राजघाटावर पूजा करण्यासाठी गेले होते.
अटक होण्याआधी सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं होत की, ''आज पुन्हा सीबीआय मुख्यालयात जात आहे, मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.'' त्याच ट्विटमध्ये ते म्हणाले की, ''मला काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी मला पर्वा नाही. देशासाठी ज्या भगत सिंहांना फाशी देण्यात आली त्यांचा मी अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.''असे ते म्हणाले.
बातमी शेअर करा